पुणे- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण
कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र दिन: पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण - कामगार दिन
महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हेही वाचा -पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1905, जिल्ह्याचा आकडा 1738वर