पुणे - शेजारी राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या विमानतळ पोलीस स्टेशन परिसरात हा घृणास्पद प्रकार घडला. पीडित चिमुरडीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला अटक केली आहे. शनिवारी सकाळी 9:30 ते 12:30 च्या दरम्यान हा प्रकार घडला.
विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही चिमुरडी आईवडिलांसोबत राहते. तिचे आईवडील दोघेही बिगारी काम करतात. शनिवारी सकाळी दोघेही कामासाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळे चिमुरडी घरात एकटीच होती. त्याचवेळी घराशेजारी राहणारा 20 वर्षीय तरुण घरी आला. चिमुरडी घरात एकटी असल्याचे पाहून जवळच असणाऱ्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये नेले आणि एका चारचाकीच्या आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला घरीही नेऊन सोडले..
दरम्यान या चिमुरडीचे आईवडील कामावरून परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यांनी पोलिसात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
पुण्यात शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार - पाच वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार
शेजारी राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या विमानतळ पोलीस स्टेशन परिसरात हा घृणास्पद प्रकार घडला. पीडित चिमुरडीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार
Last Updated : Feb 14, 2021, 10:11 PM IST