पुणे (पिंपरी) - मोशी येथे प्लास्टिक वापरणाऱ्या पाच व्यापाऱ्यांना 25 हजारांचा दंड आकारण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग व भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यावसायिकांकडून साडे बारा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई-
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, विजय दवाळे, पोलीस निरीक्षक गिरणार, भांडे, आरोग्य निरीक्षक अंकुश झीटे, वैभव कांचनगौडा, आरोग्य मुकादम रवींद्र गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईत सुमारे 40 व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली.