महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीत भीषण आगीत पाच दुकाने जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही - पुणे पिंपरी चिंचवड लेटेस्ट न्यूज

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील झुलेलाल घाट परिसरात अचानक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. यात, पाच दुकाने जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत पहाटे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Pimpri Chinchwad Jhulelal Ghat Five shops fire
पिंपरीत भीषण आगीत पाच दुकाने जळून खाक

By

Published : Mar 10, 2021, 12:49 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - झुलेलाल घाट परिसरातील पाच दुकानांना भीषण आग लागल्याने दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली असून अचानक येथील लाकडाच्या, भंगार आणि किराणा दुकानांना भीषण आग लागली होती. पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पहाटे पाचच्या सुमारास शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही.

पिंपरीत भीषण आगीत पाच दुकाने जळून खाक
भीषण आगीत 5 दुकाने जळून खाक

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील झुलेलाल घाट परिसरात अचानक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. यात, पाच दुकाने जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत पहाटे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

दुकाने बंद असल्याने जीवितहानी नाही

आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली आहे. परंतु, दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे शांताराम काटे यांनी माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details