पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. होर्डींग उभारण्याकरिता फिर्यादी यांनी 28 निविदा भरल्या होत्या. मात्र त्याची वर्कऑर्डर न निघाल्याने संबंधित व्यक्तींना भेटले होते. तेव्हा, करारनाम्यावर सही करण्यासाठी तीन टक्के म्हणजे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडअंती दोन टक्क्याने म्हणजे सहा लाख घेण्याचे ठरले. त्यानुसार आज एक लाख अठरा हजाराची लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह पाचजण एसीबीच्या जाळ्यात - स्थायी समितीच्या अध्यक्ष
होर्डींग उभारण्याकरिता फिर्यादी यांनी 28 निविदा भरल्या होत्या. मात्र त्याची वर्कऑर्डर न निघाल्याने संबंधित व्यक्तींना भेटले होते. तेव्हा, करारनाम्यावर सही करण्यासाठी तीन टक्के म्हणजे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडअंती दोन टक्क्याने म्हणजे सहा लाख घेण्याचे ठरले. त्यानुसार आज एक लाख अठरा हजाराची लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे.
याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक), राजेंद्र जयंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भीमराव काळे (शिपाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होर्डींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजुर झालेल्या होत्या. परंतु त्यांची वर्कऑर्डर न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले. तेव्हा, वर्कऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) ३ टक्के रक्कम म्हणजे १० लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रूपये घेण्याचे मान्य झाले. ६ लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी आज तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक - विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई - अरविंद कांबळे यांचेमार्फत स्वीकारली. दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने धाड टाकून या सर्वांना ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे या करत आहेत.