पुणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यातच कोरोनाला आळा घालण्याकरता दिवसरात्र एक करून लढा देणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र आहे. यातच आज आळंदी पोलीस ठाण्यातील 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे.
आळंदी पोलीस ठाण्यातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण - alandi corona updates news
पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्यातील आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील कोरोनाबधितांची संख्या 7 वर पोहोचली आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्यातील आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आळंदी पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या 2 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस ठाण्यातील कोरोनाबधितांची संख्या 7 वर गेली आहे. तर, यामुळे आळंदी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्याच्या बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी आळंदी पोलीसांच्या खांद्यावर होती. अशात पोलीसांनाच कोरोनाची लागण झाल्याने या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.