महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात आज पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू, एका पोलिसाचाही समावेश - कोरोना व्हायरस पुणे

पुण्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूचाही आकडा वाढत आहे. पुण्यात सकाळपासून पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

five-corona-patients-die-in-pune-today
five-corona-patients-die-in-pune-today

By

Published : May 4, 2020, 5:03 PM IST

Updated : May 4, 2020, 6:41 PM IST

पुणे- भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून पुण्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूचाही आकडा वाढत आहे. पुण्यात सकाळपासून पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

हेही वाचा-लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...

पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर इतर चार जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा आज मृत्यू झाला असून पुण्यातील कोरोनामुळे मृत्यूचा आकडा आता 106 झाला आहे.

Last Updated : May 4, 2020, 6:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details