पुणे- विजेचा धक्का लागून पाच म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली परिसरातील विठ्ठलवाडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यात शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजेच्या धक्क्याने पाच म्हशींचा मृत्यू, पुण्याच्या वाघोलीतील घटना - महसूल व पशुवैद्यकीय अधिकारी
विजेचा धक्का लागून पाच म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली परिसरातील विठ्ठलवाडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
पाच म्हशींचा मृत्यू
येथील शेतकरी दिलीप रघुनाथ जगदाळे यांच्या पत्र्याच्या गोठ्यामध्ये पाच म्हशी होत्या. रात्री वायरच्या झालेल्या शॉर्टसर्किटमुळे विजेचा मोठा धक्का बसून या पाचही म्हशींचा मृत्यू झाला आहे. तर शेजारीच असणाऱ्या एका दुसऱ्या कोठ्यातील 30 ते 40 म्हशी बचावल्या आहेत. एका म्हशीची किंमत अंदाजे एक ते दीड लाखापर्यंत आहे. याप्रकरणी पोलीस, महसूल व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.