पुणे - मुलीच्या तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर, लाळ गळायची बंद होते, असा काहींचा समज आहे. ऐकीव माहितीच्या आधारे ऊसतोड महिलेने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. मात्र, मासा तोंडातून फिरवत असताना तो बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला.
लाळ गळते म्हणून जीवंत मासा तोंडात फिरवणे पडले महागात - girl
दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया १० मिनिटे चालली. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला.
बारामतीचे डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात चिमुकल्या अनुला आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा आणि सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी (सीपीआर) क्रिया करण्याचा प्रयत्न करीत हृदय पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लागेच तिच्यावर दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया १० मिनिटे चालली. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला. चिमुकलीच्या आई-वडिलांना डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हेच सुचत नव्हते. डोळ्यातील पाण्यानेच त्यांनी डॉक्टरांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.