पिंपरी चिंचवड -चिखली येथे आयोजित बैलगाडा शर्यत दीड ( Bullock Cart Race Chikhali ) कोटींच्या बक्षिसामुळे चर्चत आली होती. गेल्या 5 दिवसात तब्बल 1200 बैलगाडे घाटात धावले. 28 लाखाची जेसीबी, 12 लाखाची बोलेरो, 11 लाखांचे दोन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट आणि 80 लाखांच्या 114 दुचाकींचा यात समावेश होता. मंगळवारी मावळ तालुक्यातील शेतकरी रामनाथ वारींगे यांच्या बैलगाड्याने 11:22 सेकंदात घाट पार करत पहिला क्रमांक मिळवला. त्याच पहिल्या क्रमांकामध्ये आणखी चार बैलगाडे 11:22 सेकंदच्या खालोखाल आल्याने त्यांना देखील हे बक्षीस विभागून देण्यात आले. देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील शर्यतीकडे पाहिले जात होत. दीड कोटींची बक्षीस असल्याने अवघ्या महाराष्ट्रात या शर्यतीची चर्चा होती. आमदार महेश लांडगे यांनी भरवलेल्या या शर्यतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाडामालकांनी सहभाग नोंदवला होता.
बक्षीस वितरण :