पुणे- प्रशासनाला लोकांसाठी उत्तरदायित्व करणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा हा संपूर्ण देशात 12 ऑक्टोबर, 2005 पासून लागू करण्यात आला. 12 ऑक्टोबरला हा कायदा लागू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला पुण्यातून सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी अर्ज करून माहिती घेतली. या अर्जात महावितरणबाबत काही माहिती मिळवण्यासाठी वेलणकर यांनी हा अर्ज केला होता. गेल्या 15 वर्षात 500 हून अधिक अर्ज करून वेलणकर यांनी माहिती घेतली आहे.
हा कायदा केव्हा अंमलात आला
हा कायदा 12 ऑक्टोबर, 2005 रोजी अंमलात आला. 15 जून, 2005 रोजी तयार झाल्यापासून 120 व्या दिवशी या कायद्यातील काही तरतुदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या. उदा. सार्वजनिक प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या, जनमाहिती अधिकारी व सहायक जनमाहिती अधिकारी यांची पदे, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना, कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे आणि कायद्यातील तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार.
वर्षाला राज्यातून काही लाख अर्ज होतात दाखल