पुणे - शहरातील चाकण औद्योगीक नगरीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार झाला. यामध्ये गोळी तरुणाच्या पायाला स्पर्श करून गेली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. संकेत गाडेकर, असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
संकेत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी संकेतचे चाकणमधील काही तरुणांसोबत भांडण झाले होते. त्या वादातून संकेत बचावला होता. मात्र, त्या तरुणांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडोबा माळ येथे संकेतला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केला. मात्र, संकेतने पळ काढला. त्यामुळे त्या तरुणांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी त्याच्या पायाला स्पर्श करून गेली. सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.