पुणे- सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे आणि त्याच्या इतर दोन साथीदाराने एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. प्रशांत लांडगे असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांने भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, घटनेने नंतर परिसरात भीतीचे वातावरण होते.
दहशत पसरविण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार, एकाला मारहाण - pune crime news
सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे हे प्रशांत लांडगे यांच्या घरी गेले. त्यांनी शिवीगाळ करुन प्रशांतला मारहाण केली. यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.

हेही वाचा-निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे हे प्रशांत लांडगे यांच्या घरी गेले. त्यांनी शिवीगाळ करुन प्रशांतला मारहाण केली. प्रशांतने आरडा ओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले. तेव्हा ज्ञानेश्वर लांडगे याने हवेत गोळीबार करुन प्रशांत याच्या गळ्यातील ५ तोळे सोन्याची साखळी पळवली. दरम्यान, गणेश धोत्रे याने कुऱ्हाडीने तर मल्लेश कोळवी याने लाकडी दांडक्याने घरातील सामानाची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. त्यानंतर ते फरार झाले होते. यापैकी मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षण राजेंद्र कुंटे हे करत आहेत.