दौंड: दौंड तालुक्यातील यवत परिसरात मानकोबावाडा येथे मंगळवारी रात्री एका आरोपीने पुणे शहर पोलिसांच्या युनिट एकच्या पथकावर गोळीबार केला आहे. (Firing at Pune police in daund). सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याबाबत अधिक तपास यवत पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. निहालसिंग मन्नुसिंग टाक असे पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
Firing At Pune Police: पुणे पोलिसांवर गोळीबार, आरोपी घटनास्थळावरून फरार - यवत परिसरात मानकोबावाडा
दौंड तालुक्यातील यवत परिसरात मानकोबावाडा येथे मंगळवारी रात्री एका आरोपीने पुणे शहर पोलिसांच्या युनिट एकच्या पथकावर गोळीबार केला आहे. (Firing at Pune police in daund).
आरोपी फरार: याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी हे घरफोडी गुन्ह्याच्या तपासासाठी यवत भागातील मानकोबा वाडा परिसरात मंगळवारी रात्री आले होते. या पथकाला पाहिजे असणारे आरोपी लकिसिंग टाक यवत येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लकिसिंग टाक हा त्याच्या साथीदारासह दुचाकीवर आला. यावेळी पोलीस पथकाने लकिसिंग यास पकडले. मात्र त्याच्या सोबत आलेला निहालसिंग हा पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. पळताना त्याने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. यात पोलीस बचावले. मात्र गोळीबार करणारा निहालसिंग हा पळून गेला. निहालसिंग याच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे शस्त्र प्रतींबधक कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष क्षिरसागर, पोलीस हवालदार प्रकाश पडवळ, प्रकाश कट्टे, दीपक क्षीरसागर हे पोलीस अधिकारी सहभागी होते .