इंदापूर:यापूर्वी दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घे, अन्यथा तुला संपवीन अशी धमकी देत कळंब येथे 2 जणांनी बंदकीतून गोळीबार केला आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात Walchandnagar Police Station खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा व शस्त्रास्त्रे प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
यांच्यावर गुन्हा दाखल:वालचंदनगर पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात सुरज दादासो वाघमोडे (रा. कळंबोली ता माळशिरस) गजानन किसन जाधव (रा. कळंब ता. इंदापुर) व काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब येथील सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके हे कळंब गावातील आंबेडकर उद्यानात मित्रांसमवेत बसलेले असताना दुचाकीवरून येऊन बंदुकीने गोळ्या झाडल्याची फिर्याद सुयश घोडके यांनी दिली आहे.
गप्पा मारत बसले असताना हल्ला: कळंब येथील आंबेडकर उद्यान येथे सुयश उर्फ तात्या यांचा मित्र महेश शंकर ढेकळे (रा एकशिव ता. माळशिरस जि. सोलापुर ) याच्यासोबत गप्पा मारत बसले असताना, पुतण्या रोहित अनिल घोडके (रा. कळंब ता. इंदापुर जि. पुणे) व त्याचा मित्र मयुर सुनिल किर्दक( रा. पिराळे ता. माळशिरस ) व अक्षय भारत बनसोडे (रा कळंब ता इंदापुर) असे झेंड्याच्या कट्ट्याच्या बाजुस असणार्या सरकारी दवाखान्याच्या पायरीवरती बसले होते.
या कारणावरून गोळीबार:त्यावेळी पांढऱ्या रंगाची दुचाकी सरकारी दवाखान्यासमोर आलेली दिसली. अचानक मला गोळी झाडल्याचा आवाज आला. दुचाकीवरून एक अनोळखी इसम व त्याचे पाठीमागे सुरज दादासो वाघमोडे (रा.कळबोली ता. माळशिरस) हा बसलेला दिसला. त्यावेळी सुरज वाघमोडे याने हातातील बंदुकीने सुयश उर्फ तात्या याच्या दिशेने गोळी झाडली, आणि जातीवाचक शिवीगाळ करत, गुन्ह्या माघारी घे या कारणावरून गोळीबार केला आहे.
पुढील तपास वालचंद नगर पोलीस:सुरज वाघमोडे याने गोळ्या झाडत दुचाकीवर बसून अन्य इसमांसह महाविद्यालयाच्या दिशेने निघुन गेले आहे. यावेळी दवाखान्यात बसलेले सुयश यांचा पुतण्या रोहित व मित्र मयुर अक्षय हे बाहेर आले व मयुर किर्दक यांच्या म्हणण्यानुसार अनोळखी इसमाने बंदुकीतून 2 गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वालचंद नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहेत.