महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात खाद्यतेलाच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज - Pune godown fire

सुरवातीला तेलाच्या गोडाऊनला लागलेली ही आग पसरत गेली आणि शेजारी असणारे आणखी दोन गोडाऊन या आगीने कवेत घेतले. खाद्य तेलाचे आणि वायरचे असे दोन गोडाऊन सध्या आगीत नष्ट झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत...

Pune oil godown fire
पुण्यात खाद्यतेलाच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज..

By

Published : May 16, 2021, 8:34 AM IST

Updated : May 16, 2021, 8:56 AM IST

पुणे :जिल्ह्यातील पुणे-सासवड रस्त्यावर वडकी गाव येथे शनिवारी मध्यरात्री एका तेलाच्या गोडाउनला भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

पुण्यात खाद्यतेलाच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज

सुरवातीला तेलाच्या गोडाऊनला लागलेली ही आग पसरत गेली आणि शेजारी असणारे आणखी दोन गोडाऊन या आगीने कवेत घेतले. खाद्य तेलाचे आणि वायरचे असे दोन गोडाऊन सध्या आगीत नष्ट झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. परंतु मोकळ्या झालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या भरण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. या आगीत कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे.

Last Updated : May 16, 2021, 8:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details