पुणे - भांडारकर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री राजश्री सोसायटी येथील एका दुमजली घराला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संदीप गोखले (वय 46) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आगीत संपूर्ण घर जळून बेचिराख झाले.
अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी सुरेश नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2 वाजून 52 मिनिटांनी भांडारकर रस्त्यावरील एका सोसायटीतील घराला आग लागल्याची वर्दी आली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले होते. घरात संदीप गोखले एकटेच राहत असून ते पहिल्या मजल्यावर झोपले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना ते गादीवर गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे : भांडारकर रस्त्यावर मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू - भांडारकर रस्त्यावर मध्यरात्री लागलेल्या आगीत एक जण गंभीर
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले होते. घरात संदीप गोखले एकटेच राहत असून ते पहिल्या मजल्यावर झोपले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना ते गादीवर गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळले.
![पुणे : भांडारकर रस्त्यावर मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू पुणे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6365317-thumbnail-3x2-dahi.jpg)
पुणे
Last Updated : Mar 11, 2020, 11:50 AM IST