महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

Fire In Pimpri Chinchwad: पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याचं बोललं जातंय. (fire at firecracker godown) तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये.

Fire In Pimpri Chinchwad
आगीची घटना

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 5:52 PM IST

आगीच्या घटनेविषयी माहिती देताना महापालिका आयुक्त

पिंपरी चिंचवड (पुणे)Fire In Pimpri Chinchwad:हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरू आहे. (6 people died in fire)



सहा महिलांचे मृतदेह बाहेर:अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध सुरू आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी कामगारांचा शोध सुरू आहे.

जखमींमध्ये सात महिला आणि एक पुरुष:पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि एक पुरुष आहे.


सहा जणांचा होरपळून मृत्यू:पिंपरी चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या मेणबत्या आणि फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याचे म्हटले जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय.

4 मजली इमारतीला फटाक्यामुळे आग: या आधीही अशीच एक घटना घडली होती. मुंबईतल्या गिरगाव येथील गोमंती भवन इमारतीला आग लागल्याची घटना 3 डिसेंबर, 2023 रोजी घडली होती. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले होते तर तीन नागरिकांना बचावण्यात यश आलं आहे.

इमारतीला भीषण आग: दक्षिण मुंबईतील गिरगाव भागातील एका इमारतीला शनिवारी रात्री भीषण आग लागली, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या गोमती भवन इमारतीला शनिवारी रात्री ९.५५ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. ग्राउंड-प्लस-थ्री मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आगीचे कारण अद्याप समजू शकलं नाही:या माहितीनंतर मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "ही आग लेव्हल 2 ची आग असून ती भीषण आग असल्याचं संबोधण्यात आलं आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या, रुग्णवाहिका आणि मोठ्या संख्येनं अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसून, तपास सुरू आहे" असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.


हेही वाचा:

  1. मुंबई : फटाक्यामुळे घराला लागली आग; बोरीवलीच्या गोराई भीम नगर परिसरातील घटना
  2. ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश
  3. मुंबईत 24 मजली इमारतीला आग; 135 नागरिकांची केली सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details