पुणे - पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी चिखली येथे एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत असून धुरांचे लोळ काही किलोमीटर अंतरावरून दिसत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दाखल - पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या गोडाऊन भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दाखल
पिंपरी-चिंचवडमधील जाधववाडी चिखली येथे एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
![पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दाखल Fire in godown at Pimpari Chinchawad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6868585-25-6868585-1587384929805.jpg)
पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या गोडाऊन भीषण आग
पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या गोडाऊन भीषण आग
मिळलेल्या माहितीनुसार, शहरातील जाधववाडी येथील रंजन वजन काट्या जवळ असलेल्या एका लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे असून अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, घटनेत कोणीही जीविहितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.