महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिपरी-चिंचवडमध्ये भीषण आग; 50 लाखांचे नुकसान - fire in atlanta beg company

शॉर्टसर्किट होऊन पिंपरीतील डॉ. अटलांटा बेग या कंपनीत भीषण आग लागली. यात तब्बल 50 लाख रुपयांच नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला. आगीत रासायनिक केमिकल जळालं असून शॉर्टसर्किटने आग लागली होती. ही घटना शनिवार रोज संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली.

fire in atlanta beg company pimpri chinchwad
पिपरी-चिंचवडमध्ये भीषण आग

By

Published : Oct 24, 2021, 2:43 AM IST

Updated : Oct 24, 2021, 4:53 AM IST

पिपरी-चिंचवड -शहरातील अटलांटा बेग या कंपनीत शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली होती. यात कंपनीचे तब्बल 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. ही घटना शनिवार रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. कंपनीतील रासायनिक मटेरियल जळाल्याने धुरांचे लोट काही किलोमीटर वरून दिसत होते. मात्र, अग्निशमन विभागाने दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवलं.

आगीची दृश्ये

पाच अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल -

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किट होऊन पिंपरीतील डॉ. अटलांटा बेग या कंपनीत भीषण आग लागली. यात तब्बल 50 लाख रुपयांच नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला. आगीत रासायनिक केमिकल जळालं असून शॉर्टसर्किटने आग लागली होती. ही घटना शनिवार रोज संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाने अथक प्रयत्नानंतर दीड तासात आग आटोक्यांत आणली. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची पाच अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.

कंपनीत काही कर्मचारी होते. शनिवार असल्याने सुट्टी होती, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीविहितहानी झालेली नाही.

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला - आदर पुनावालांची प्रतिक्रिया

Last Updated : Oct 24, 2021, 4:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details