पुणे - शहरातील जुनी वडारवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत अंदाजे 30 पेक्षा अधिक घरे जळाली आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जुनी वडारवाडी येथे भीषण आग; तीस पेक्षा अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी - पुणे आग
जुनी वडारवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत अंदाजे 30 पेक्षा अधिक घरे जळाली आहेत.
आग
हेही वाचा -गुढीपाडव्याचा बांधकाम उद्योगाचा हा 'मुहूर्त' कोरोना चुकविणार
शिवाजीनगर भागातील जुनी वडारवाडी हा दाट लोक वस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.