महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजगुरुनगरमध्ये चार घरांना आग, घरगुती सामान जळून खाक - राजगुरुनगरमध्ये चार घरांना आग

राजगुरुनगर शहरातील थिगळस्थळ येथे रात्रीच्या सुमारास चार रहात्या घरांना अचानक आग लागल्याची घटना घडली असून ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चार घरांना लागलेल्या आगीत धान्य, कपडे व अन्य घरगुती साहित्य आगीत जळुन खाक झाले आहे.

fire broke out in Four houses
fire broke out in Four houses

By

Published : Jan 25, 2021, 1:10 AM IST

Updated : Jan 25, 2021, 1:50 AM IST

राजगुरुनगर (पुणे) -शहरातील थिगळस्थळ येथे रात्रीच्या सुमारास चार रहात्या घरांना अचानक आग लागल्याची घटना घडली असून ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चार घरांना लागलेल्या आगीत धान्य, कपडे व अन्य घरगुती साहित्य आगीत जळुन खाक झाले आहे. दोन तासांच्या प्रयत्नांवर राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे

शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज -

राजगुरुनगर शहराच्या उत्तरेला असणाऱ्या थिगळस्थळ येथे दशरथ सखाराम थिगळे, काशीनाथ किसन थिगळे, मारुती पोपट थिगळे व शामराव बाळाराम थिगळे या चार जणांची कुटुंबे रहायला आहेच. रविवारी रात्री 11:00 च्या सुमारास घरामध्ये शॉट सर्किट होऊन अचानक आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी घराच्या चारही बाजुला आग लागली व आजुबाजुला असणाऱ्या घरांनाही आगीने घेरले. काही क्षणात चारही घरे जळुन खाक झाली आहेत.

राजगुरुनगरमध्ये चार घरांना आग
आगीवर नियंत्रण -

राजगुरूनगर येथील थिगळस्थळ येथे चार घरांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत एक तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या घटनेत चारही घरे लाकडी व कौलारु असल्याने आगीत जळुन खाक झाली आहेत.

नुकसान भरपाईची मागणी -

थिगळस्थळ येथील रहात्या घरांना लागेल्या आगीच्या घटनेमुळे चार कुटुंबांच्या डोक्यावरचे छत गेल्याने रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली असुन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी रेवननाथ थिंगळे यांनी केली आहे.

Last Updated : Jan 25, 2021, 1:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details