महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये शॉर्टसर्किटमुळे कपड्याच्या दुकानांना भीषण आग - fire broke out in pimpari chinchawad

पिंपरी-चिंचवड शहरातील शगुन चौकात आज दुपारी कपड्याच्या दुकानांना भीषण आग लागली. सुदैवाने लॉकडाऊन असल्याने सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही.

fire broke out in cloth shop in pimpari chinchawad
पिंपरी-चिंचवडमध्ये शॉर्टसर्किटमुळे कपड्याच्या दुकानांना भीषण आग

By

Published : Apr 28, 2020, 4:48 PM IST

पिंपरी-चिंचवड(पुणे) - शहरातील शगून चौकात आज दुपारी कपड्याच्या दुकानांना भीषण आग लागली. सुदैवाने लॉकडाऊन असल्याने सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शॉर्टसर्किटमुळे कपड्याच्या दुकानांना भीषण आग
पिंपरी पोलीस चौकी येथून महिला पोलीस कर्मचारी बारसे यांनी फोन करून पिंपरीमधील शगुन चौकातील दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी संत तुकाराम नगर, पिंपरी येथील मुख्य अग्निशमन केंद्राचे २, राहटणी उप-अग्निशमन केंद्राचे १, प्राधिकरण अग्निशामक केंद्राचे १ आणि चिखली येथील १ अशा एकूण ५ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. घटनास्थळी कपड्याचे दुकान न्यू हरिष किड्स अँड मेंस वेअर रेडिमेड, राम ऑप्टिकल्स, पियुष मेन्स वेअर असे एकूण तीन दुकानामध्ये भीषण आग लागली होती.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अथवा कोणीही जखमी झाले नाही, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या विभागाने वर्तवली आहे. घटनास्थळी उप-अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, लि.फायरमन संजय ठाकूर, फायरमन प्रतीक कांबळे, फायरमन विजय घुगे, संभाजी दराडे, निखिल गोगवले, सारंग मंगरूळकर, विकास भोंगाळे, अंकुश बडे, भाईदास बाटूगें, सचिन माने, हनुमंत होले, वाहन चालक गोविंद सरोदे, विशाल फडतरे, नीळकंठ दुबे राजाराम लांडगे, संतोष सरोटे, आग विझवण्यासाठी तब्बल तीस जवान कार्यरत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details