चाकण औद्योगिक वसाहतीत बंद कंपनी आगीत भस्मसात - chakan fire
चाकण औद्योगीक वसाहतीतील कुरुळी येथील कडवस्तीजवळील श्री साई समर्थ कोटिंग या बंद कंपनीला रविवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली.
पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी येथील कडवस्तीजवळील श्री साई समर्थ कोटिंग या बंद कंपनीला रविवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी पाच तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
श्री साई समर्थ कोटिंग या कंपनीत पेंटींगची कामे केली जातात. लॉकडाउनमुळे कंपनी बंद होती. कंपनीला सायंकाळी अचानक आग लागली. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. दरम्यान ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने कंपनीला लागलेल्या आगीत जीवीतहानी टळली. मात्र, कंपनीसह साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.