महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्वे रस्त्यावर हँडलूमच्या दुकानाला आग; जीवितहानी टळली - कर्वे रोड हँडलूमच्या दुकान आग

कर्वे रस्त्यावरील प्राईम हँडलूम या दुकानाला गुरूवारी दुपारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशामक दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

प्राईम हँडलूम
प्राईम हँडलूम

By

Published : Dec 26, 2019, 5:31 PM IST

पुणे -कर्वे रस्त्यावर असलेल्या हँडलूमच्या दुकानाला गुरुवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. प्राईम हँडलूम या दुकानाला ही भीषण आग लागली. आग लागल्याने दुकानातून धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडत होते. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

प्राईम हँडलूम दुकानाला आग

हेही वाचा - ...असे पार पडले या वर्षातील अखेरचे ग्रहण
या आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशामक दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण स्पष्ट झालेली नाही. आगीचे स्वरूप खूप मोठे होते मात्र, यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दुकानातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details