दौंड (पुणे) -दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या कंपनीच्या आवारातील गवताच्या पालापाचोळ्याला आज (दि. 14 मार्च) दुपारी अचानक आग लागली. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्नीशामक दलाच्या जवानांनी ही आग वेळेत आटोक्यात आणली. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अनेक रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या असल्याने वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला आहे.
अनेक दिवसांपासून बंद होती कंपनी
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील येथील स्नेहा अॅन्टीबायोटीक ही कंपनी बंद आहे. या कंपनीच्या आवारात गवत व झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आज दुपारी या पालापाचोळ्यास आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती .