पुणे - कोंढवा परिसरातील गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत चार ते पाच मोटारी जळून खाक झाल्या आहेत. ही घटना कौसरबाग परिसरात बुधवारी (दि. 24 जून) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमुळे चार ते पाच भंगार गोदाम आणि इतरही दोन दुकानांना आग लागली होती. तब्बल पाऊण तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात गॅरेजला भीषण आग, आसपासच्या दुकानांनाही झळ - पुणे अग्निशमन दल बातमी
कोंढव्यातील कौसरबाग परिसरात एका गॅरेजला आग लागली होती. या आगीने भडका घेतल्याने शेजारी असलेल्या भंगार गोदाम व गॅरेजला आगीची झळ बसली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
आगीचे रौद्ररुप
कोंढवा परिसरातील हा भाग नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी ही आग लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा -'गोपीचंद पडळकरांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज'