महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बापरे! मुलगी टेरेसवरून पडली चौथ्या मजल्याच्या खिडकीवर, अग्निशमन दलाने वाचवले - अग्निशमन दल

पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी चित्तथरारक घटनेनंतर चौथ्या मजल्यावर खिडकीबाहेर लटकलेल्या 14 वर्षीय मुलीची सुखरुप सुटका केली.

पुणे
पुणे

By

Published : Aug 9, 2021, 5:52 PM IST

Updated : Aug 9, 2021, 7:17 PM IST

पुणे - पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानांकडून चित्तथरारक घटनेनंतर चौथ्या मजल्यावर खिडकीबाहेर लटकलेल्या 14 वर्षीय मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये आज सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीला खाली उतरवल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

पुण्यात चौथ्या मजल्यावर अडकली 14 वर्षांची मुलगी

चौथ्या मजल्यावर अडकली मुलगी

साडीला पकडून थांबलेली मुलगी

शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर खिडकीमध्ये एक मुलगी अडकली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यावेळी चौथ्या मजल्यावर खिडकीच्या ग्रिलवर साडीला धरून ही मुलगी उभी असल्याचे दिसून आले.

अखेर मुलीला सुखरूप उतरवण्यात यश

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खाली जाळी धरून ठेवली. तर काही जवानांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन तेथून या मुलीकडे दोरी फेकली. इतर काही जवान सीढी लावून तिच्यापर्यंत पोहोचले आणि तिला खाली उतरवले.

नक्की काय घडलं होतं?

अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलीच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. नातेवाईकांनी मुलगी टेरेसवरून पाय घसरल्यामुळे खाली पडली असल्याचे सांगितले. ज्या खिडकीत ती अडकली होती, येथील महिलेने तिचा पाय धरून ठेवला होता. तर वरच्या मजल्यावरील खिडकीतून साडी सोडण्यात आली होती. या साडीला धरून ही मुलगी उभी राहिली होती.

या कामगिरीमधे अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, वाहनचालक राजू शेलार जवान राहूल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकूळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे सहभाग घेतला होता.

हेहा वाचा -धोकादायक घरं खाली करण्यास पोलीस कुटुंबांचा विरोध; पोलीस पत्नी पोहोचल्या 'कृष्णकुंज'वर

Last Updated : Aug 9, 2021, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details