पुणे -जुन्नर तालुक्यातील अलदरे गावात किसन पांडू घोगरे या आदिवासी शेतकऱ्याच्या पत्रा शेडच्या राहत्या घराला मंगळवारी अचानक आग लागली. या घटनेत वृद्धेला काही प्रमाणात भाजले. या आगीत 6 शेळ्या आणि 4 लहान करडांचा जागीच मृत्यू झाला. तर,दागिने, रोख रक्कम तसेच संसारोपयोगी वस्तू असे एकूण २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आदिवासी वयोवृद्ध शेतकऱ्याच्या घराला आग, पाळीव प्राण्यांचा होरपळून मृत्यू - News about farmers
जुन्नर तालुक्यातील अलदरे गावात एका आदिवासी शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्या शेतकरी कुटुंबाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
आदिवासी वयोवृद्ध शेतकऱ्याच्या राहत्या घराला लागली आग
घटनेनंतर स्थानिक तलाठी यांच्या तातडीने पंचनामा करण्यात आला. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी किसन घोगरे व ग्रामस्थांनी केली आहे. वृद्धापकाळात संसार आगीमध्ये काही क्षणातच भस्मस्थानी गेल्याने घोगरे कुटुंब बेघर झाले आहे. त्यामुळे या वयात या कुटुंबाला आधार देऊन मदतीचा हात कोण देणार, हा खरा प्रश्न आहे.