महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट - Marvel vista building fire

शहरातील लुल्लानगर भागातील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या ( fire breaks out in restaurant ) रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी हजर ( building in Pune Lullanagar ) आहेत.

fire breaks out in restaurant
पुण्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण आग

By

Published : Nov 1, 2022, 9:23 AM IST

Updated : Nov 1, 2022, 11:04 AM IST

पुणे: शहरातील लुल्लानगर भागातील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या ( fire breaks out in restaurant ) रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी हजर ( building in Pune Lullanagar ) आहेत.

पुण्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण आग

पुण्यातील कोंढवा येथील मार्वल विस्टा बिल्डिंग (पीएनजी ब्रदर्स) येथे आगीची घटना घडली आहे. पुण्यातील कोंढवा येथील लुल्लानगर चौक, मार्वल विस्टा बिल्डिंग(पीएनजी ब्रदर्स) येथे आगीची घटना घडली आहे.अग्निशामक दलाची 3 अग्निशमन वाहने व 3 टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आली आहे. मार्वल विस्टा बिल्डिंग ( Marvel vista building fire ) येथे एक हॉटेल आहे. या हॉटेलला आग नेमकी कशामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



आज सकाळी 8:14 वाजता अग्निशामक दलाला वर्दि मिळाली होती. कोंढवा येथील लुल्लानगर चौक, मार्वल विस्टा बिल्डिंग(पीएनजी ब्रदर्स) येथे आगीची घटना घडली होती .9 वाजल्याच्या सुमारास आग विझवण्यात आली आहे. कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. या आगीत जखमी वा जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

Last Updated : Nov 1, 2022, 11:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details