पुणे : या आगीत मोठ्या प्रमाणत दुकानांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही. मंगळवार पेठ, जुना बाजार येथे सकाळी ७ वाजून ३८ वाजता आग लागली. आगीत पत्रा व लोखंडी शेड असलेले दुमजली अंदाजे ८ ते १० दुकाने होती. या दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाचे ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ८ वाजून २४ मिनिटांनी व आग आटोक्यात आणत धोका दुर करण्यात आला आहे. घटनास्थळी धूर मोठ्या प्रमाणात होता. दुकानात मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य जास्त प्रमाणात होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. जखमी व जीवितहानी नाही. सध्या कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.
अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील दुकानांना आग : या आधीही सात जानेवारीला अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील दुकानांना आग लागली होती. अब्दुल रहमान रस्त्यावरील जुम्मा मशिदीजवळील 7 ते 8 दुकानांना रात्री 8.15 च्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य केले होते. तसेच पोलीस, पालिका कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अब्दुल रहमान रस्त्यावरील चार मजली इमारतीला आग लागून 7 ते 8 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
20 दुकाने जळूनखाक : तसेच या आधीही 2 जानेवारीला उरण तालुक्यातील सोनारी गावाच्या हद्दीमध्ये असणारी 20 दुकाने जळूनखाक झाली होती.जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान झाले होते. प्रकल्पग्रस्त बेरोजगार स्थानिकांना उदरनिर्वाहाच साधान मिळावा या हेतूने जेएनपिटी बंदर प्रशासनाकडून ही दुकाने देण्यात आली होती. मात्र ही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने, येथील 20 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आग लागून दुकाने नष्ट झाल्याने 20 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पुन्हा एकदा दुकानाची उभारणी करण्याची ऐपत नसल्याने, या दुकानदारांकडून जेएनपीटीने प्रकारची दाखल घेऊन दुकानाची उभारणी करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. सध्यातरी या 20 कुटुंबावर उपास्मारीची वेळ आली आहे.उरण तालुक्यातील सोनारी गावाच्या हद्दीमध्ये असणारी 20 दुकाने जळून खाक झाली होती. प्रकल्पग्रस्त बेरोजगार स्थानिकांना उदरनिर्वाहाच साधान मिळावा या हेतूने जेएनपिटी बंदर प्रशासनाकडून ही दुकाने देण्यात आली होती. मात्र ही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने, येथील 20 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Video घराला लागली आग बाहेरही जाता येईना महिलेने थेट तिसऱ्या मजल्यावरूनच मारली उडी पहा व्हिडीओ