पुणे : महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर वसंत मोरे साईनाथ बाबर आणि इतर आंदोलनकर्ते महापालिकेच्या सुरक्षारक्षकांच न ऐकताच आत गेले. महापालिका इमारतीच्या आवारात कोणत्याही प्रकारची आंदोलन करण्यास मनाई असतानाही आदेशाचा भंग करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर मोठा जमाव जमवत आंदोलन केलेआणि या साऱ्या नंतर अशोक राजाराम बनकर यांनी तक्रार दिली आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे अधिक तपास करत आहेत.