महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात जमिनीसाठी कर्नलने गावात घुसवले सशस्त्र लष्कर, ग्रामस्थांमध्ये पसरली भीती - लष्करी जवान

आरोपींनी गावात लष्कारी गणवेशातील जवान रायफलसह फिरवून मोनिका आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भिती निर्माण केल्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मोनिका यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावात आलेले जवान

By

Published : Jun 25, 2019, 12:46 PM IST

Updated : Jun 25, 2019, 1:34 PM IST

पुणे - जमिनीचा ताबा घेण्यासाठी लष्करी जवानाने ३० ते ४० जवान गावात आणले. तसेच शेतीत घुसून शेतमालाचे नुकसान केले. याप्रकणी कर्नल, लष्करी जवान केदार विजय गायकवाड यांच्यासह ३० ते ४० लष्करी जवानांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील गुळानी येथील रहिवासी मोनिका गणेश गाडे आणि आरोपीच्या भावामध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद आहे. सातबारा उताऱ्यावरील मालकीनुसार मोनिकाच्या नातेवाईकांनी या जमिनीत सोयाबीनची पेरणी केली होती. त्यामुळे आरोपीने त्यांना जमिनीतून हुसकावून लावण्यासाठी तसेच मालकी हक्क दाखवण्यासाठी लष्काराच्या ४ गाड्यांमधून ३० ते ४० जवान शस्त्रासह लष्करी वेशात गावात आणले. शेतात लावलेल्या सोयाबीनमध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून नुकसान केले.

गावात लष्कारी गणवेशातील जवान रायफलसह फिरवून आरोपींनी मोनिका आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भिती निर्माण केल्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मोनिका यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीत अधिक तपास पोलीस कर्मचारी विक्रम गायकवाड करत आहेत.

Last Updated : Jun 25, 2019, 1:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details