पुणे - राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर ( Missused Of Police Administration For President Medal ) करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लिपीकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक जगताप, नितेश अरविंद आयनुर, रविंद्र धोंडीबा बांदल, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांवर काल रात्री वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या संदर्भात वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी तक्रार दिली होती.
हा प्रकार 26 जुलै 2017 ते 29 जानेवारी 2020 या कालावधीत घडला आहे. पोलीस हवालदार गणेश जगताप सध्या विशेष शाखेत आहे. 2017 ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात होते. स्वतःच्या फायद्यासाठी आणि राष्ट्रपती पोलीस पदक मिळवण्यासाठी गुन्हेगारी कट करून शासनाची फसवणूक करण्यासाठी सेवापुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करून खोटा दस्त तयार केला. त्यावर बनावट सह्या करून सरकारी शिक्यांचा गैरवापर केला असल्याचे म्हटले आहे.