पुणे -कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह देऊन आर्थीक लूट करण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील आळेफाटा आरोग्य केंद्रात समोर आला आहे. येथील कर्मचारीच कोरोना रुग्णांना उपचार करून देण्यासाठी 40 हजार रुपये घेत असून याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेड आणि उपचार करण्यासाठी चक्क 40 हजार -
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोरोनाचे चाचणी अहवाल स्वतः तयार करून बाधित रुग्णाला इतर रुग्णालयात बेड आणि उपचार करून देतो असे सांगत चक्क 40 हजार रुपये घेत होते. नागरिकांच्या सतर्कतेने हा संपूर्ण प्रकारसमोर आला आहे. आता याला याप्रकरणी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.