दौंड (पुणे):दौंड तालुक्यातील पाटस येथे भाजपाच्या वतीने मतदारांशी संवाद कार्यक्रमाचे (bjp Communication program with voters) आयोजन केले होते. यावेळी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman daund visit) यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना 2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल. देशाची अर्थव्यवस्था येणाऱ्या 25 वर्षांत मोठी उंची गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त ( Nirmala Sitharaman on Indian Economy ) केला. तसेचं, दौंडमधील रस्तेही मोठ्या प्रमाणात विकसीत होतील. येणारा काळ देशासाठी अमृत काळ आहे. अस निर्मला सीतारमण म्हणाल्या.
दौंडचे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे संबंधीचे सर्व प्रश्न सोडवणार - सीतारमन दौंड आणि परिसरातील राष्ट्रीय महामार्गासंबंधीचे, रेल्वेसंबंधित (Ministry of Railways India) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संबंधित खात्यांचे मंत्री या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संवाद कार्यक्रमात तुमच्या सर्व समस्या मी ऐकून घेतल्या आहेत. तरीही मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधीत खात्याच्या मंत्र्यांना सर्व समस्या तातडीने सोडवण्यासाठी सांगणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पुढे बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाजपाचे नेते जनतेच्या कायम संपर्कात असतात. यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या जातात. सर्वसामान्यांना छोट्या मोठ्या समस्या असतील किंवा काही अडचणींबाबत सूचना आल्या तर या समस्या सोडवणे आवश्यक असते. यामुळे आज येथे मांडण्यात आलेल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.