पुणे -पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली असून याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप पुकारला होता. शहरात दिवसभर काटेकोर पणे आणि शांततेत बंद पाळले गेला. तसेच, आरटीओ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलन केल गेलं. अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे संप मागे ( Rickshaw drivers strike back ) घेण्यात आलं आहे.
Rickshaw Strike : अखेर पुण्यातील रिक्षा चालकांचा संप मागे
पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली असून याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप पुकारला होता. हा संप अखेर मागे ( Rickshaw drivers strike back ) घेण्यात आला आहे.
संप मागे -आज पुकारलेल्या संपामध्ये शहरातील बारा रिक्षा संघटना सहभागी झाले होते.आज बेमुदत आंदोलन सुरू असताना काही संघटनांनी याला पाठिंबा दिला नाही.म्हणून शहरात अल्प स्वरूपात रिक्षा सुरू होत्या.पण दुपारनंतर आक्रमक पणे आंदोलन झाल्यावर पूर्णपणे बंद पाळण्यात आला.
बाईक टॅक्सी अॅपवर कारवाई -10 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी अॅपवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रिक्षाचालकांनी सोमवारी सायंकाळी संप मागे घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलन स्थळी येऊन रिक्षाचालकांची भेट घेतली. त्यावेळी कोलते यांनी आश्वासन दिल्यानंतर रिक्षा चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु 10 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी अॅपवर बंद झाले नाही, तर रिक्षा चालक पुन्हा आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे.