महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जादा बिल आकारणी व बिलाला तगादा लावल्याप्रकरणी चाकण क्रिटी केअर रुग्णालयाच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल - Pune corona न्यूज

कोरोना संसर्ग होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या वाढीव बिलासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली असून चाकण पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे न्यूज
जादा बिल आकारणी व बिलाला तगादा लावल्याप्रकरणी चाकण क्रिटी केअर रुग्णालयाच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

By

Published : May 30, 2021, 6:56 PM IST

चाकण (पुणे) -कोरोना महामरीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर आणि आरोग्य सेवक जीवाची बाजी लावून काम करत असतात. मात्र याला अपवाद काही रुग्णालय व डॉक्टर याचा फायदा घेत असल्याचा अनुभव एका रुग्णाला आला आहे.

चाकण पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोना संसर्ग होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या वाढीव बिलासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली असून चाकण पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णाकडून जादा बिल आकारणी करणे व बिलाला तगादा लावणे यासाठी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची ही पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोणतेही खाजगी रुग्णालय जर वाढीव बिल आकारणी करीत असेल तर त्यावर ऑडिट होऊन त्या ऑडिटचा रिपोर्ट दाखल केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळल्यास सदर रुग्णालय आणि डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असा आदेश दिला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अवाजवी जादा दर आकारणी
याबाबतची अधिक माहिती अशी की, विजय पोखरकर कोरोना बाधित रुग्ण म्हणून उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराबद्दल रुग्णालय प्रशासनाने पुष्पा विजय पोखरकर यांना 2 लाख 53 हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम भरण्याबाबत पुष्पा पोखरकर यांनी रुग्णालयाकडे विचारणा केली पण हे बिल भरावे लागेल, असं सांगण्यात आलं. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अवाजवी जादा दर आकारणी करून 2 लाख 53 हजार रुपयांची रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांना भरण्यास सांगितले याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाला रक्कम शासकीय नियमाप्रमाणे द्यावी अशी सूचना करण्यात आली होती. मात्र वारंवार सूचना करूनही रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याचे समजते. अखेर या प्रकरणी खेड तालुक्यातील चाकण क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर घाटकर डॉ. सीमा घाटकर यांच्यासह डॉक्टर राहूल सोनवणे डॉक्टर सीमा गवळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा चाकण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details