महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेसीबीतून विजयी उमेदवारांवर गुलाल भंडाराची उधळण, गुन्हा दाखल - gram panchayat election result 2021 news

खडकवाडी गावात ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून जेसीबीतून गुलाल व भंडाराची उधळण करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अनिल सखाराम डोके, संतोष चंदर डोके, गुलाब वाळुंज, सुभाष लहू सुक्रे यांच्यासह 15 ते 20 जणांवर 188, 135 कलामांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed a crime for violating the Collector's order in manchar police station pune
जेसीबीतून विजयी उमेदवारांवर गुलाल भंडाराची उधळण, गुन्हा दाखल

By

Published : Jan 19, 2021, 10:28 AM IST

आंबेगाव (पुणे) - तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून जेसीबीतून गुलाल व भंडाराची उधळण करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अनिल सखाराम डोके, संतोष चंदर डोके, गुलाब वाळुंज, सुभाष लहू सुक्रे यांच्यासह 15 ते 20 जणांवर 188, 135 कलामांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी जेसीबी देखील जप्त केला आहे.

जेसीबीतून विजयी उमेदवारांवर गुलाल भंडाराची उधळण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निकालानंतर जल्लोष करणे, मिरवणुक काढणे, गुलाल भंडाराची उधळण करण्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली होती. मात्र आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे जेसीबीच्या रोडरमध्ये गुलाल भंडारा भरून विजयी उमेदवाराची मिरवणूक काढून पुणे जिल्हाधिकारी यानाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुक शांततेत पार पाडावी व या दरम्यान गर्दी होऊन कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या विजय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details