पुणे : भाजप नेते किरीट सोमैया (BJP leader Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी शिवसैनिकांकडून पुणे महापालिकेच्या आवारात हल्ला (Attack in the premises of PMC ) करण्यात आला होता. या प्रकरणी शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच काही साथीदार यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरीट सोमैया यांनी ट्विट करत गुन्हा दाखल केलेल्या लोकांची नावे आणि घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
नेमकं काय झालं होतं -
किरीट सोमैया शनिवारी पुणे दौऱ्यावर (Kirit Somaiya Pune tour) होते. प्रथम ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्वीकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत त्यांच्या माकडहाडाला जबर दुखापत झाली होती. पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये सोमय्या यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना काल (रविवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.