महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Trupti Desai on Indorikar Maharaj : महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंमत असेल तर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा - तृप्ती देसाई - इंदोरीकर महाराज लातूर कोरोना विधान

महाविकास आघाडी सरकारमध्ये हिम्मत असेल तर ज्याप्रमाणे कोरोनाची इंदुरीकर महाराज ( Kirtankar Indorikar Maharaj ) चेष्टा करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून राज्यात समान न्याय आहे हे दाखवावं, असे आव्हान त्यांनी दिले आहे. ( Trupti Desai on Indorikar Maharaj's Latur Statement )

trupti desai
तृप्ती देसाई

By

Published : Jan 15, 2022, 3:24 PM IST

Updated : Jan 15, 2022, 3:54 PM IST

पुणे -किर्तनकार इंदुरीकर महाराज ( Kirtankar Indorikar Maharaj ) यांनी नुकतेच लातूर येथे एक विधान केलं असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ( Indorikar Maharaj Latur Statement ) त्यांच्या या विधानावर भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली. ( Trupti Desai on Indorikar Maharaj's Latur Statement )

सर्वसामान्यांना वेगळा न्याय का?

इंदुरीकर दरवेळेस कीर्तनातून काहीतरी बरगळत असतात. मागच्या वेळी त्यांनी लस घेणार नाही, असे सांगितले तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. याआधी अनेकदा महिलांबद्दल बोलले तेव्हाही काहीही झाले नाही. आत्ता परत त्यांनी तिसऱ्या लाटेबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, मी माळकरी आहे म्हणून कोरोना होणार नाही. किर्तनातून चुकीचं संदेश इंदुरीकर हे देत आहेत. असे असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नेहेमी त्यांची पाठराखण करत आहेत. इंदुरीकर यांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय असे काही आहे का? हे आरोग्यमंत्री यांनी सांगावे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये हिम्मत असेल तर ज्याप्रमाणे कोरोनाची इंदुरीकर महाराज चेष्टा करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून राज्यात समान न्याय आहे हे दाखवावं, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

हेही वाचा -Ajit Pawar On Lockdown : "... तर लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता", अजित पवारांचा इशारा

काय आहे प्रकरण ?

लातूर येथे एका किर्तनात ते म्हणाले, आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण, आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्मच आहे. मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. आता, तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असे महाराज म्हणाले. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात महाराजांनी तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले.

Last Updated : Jan 15, 2022, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details