महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये ५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण; एकाचा मृत्यू

By

Published : Jun 10, 2020, 7:19 AM IST

पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी तीन जण हे शहराबाहेरील रुग्ण आहेत. शहरात बाधितांची एकूण संख्या ८४३ वर पोहोचली आहे. दरम्यान नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, ५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

पुणे कोरोना अपडेट
पुणे कोरोना अपडेट

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने ५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी तीन जण हे शहराबाहेरील रुग्ण आहेत. शहरात बाधितांची एकूण संख्या ८४३ वर पोहोचली आहे. दरम्यान नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत ४८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, शहरातील १४ आणि शहराबाहेरील १९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारीही एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून ५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकूण बाधितांची संख्या ८४३ पोहोचली आहे. हे बाधित रुग्ण हे कस्पटेवस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ भोसरी, आनंदनगर, काळभोरनगर, साईबाबानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, पाटीलनगर चिखली, बौध्दनगर, नानेकरचाळ पिंपरी, गुलाबनगर दापोडी, जुनी सांगवी, सिध्दार्थनगर दापोडी, बेलटिकानगर थेरगांव, वाकड, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवी सांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, विनायक नगर पिंपळे निलख, शाहूनगर चिंचवड, पिंपरीगांव, आदित्यबिर्ला कॉलनी थेरगांव, बोपोडी, जळगाव आणि हडपसर येथील रहिवासी आहेत.

डिस्चार्ज मिळालेले कोरोनामुक्त या परिसरातील आहेत -

लिंकरोड पिंपरी, जुनीसांगवी, जयभवानी नगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, आनंदनगरचिंचवड, महात्मा फुलेनगर, भाटनगर, समतानगर नवी सांगवी, परंडवाडी, शिरुर व आंबेगांव येथील रहिवासी असलेले कोव्हिड-१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, मृत रुग्ण हा जळगाव ( पुरुष, वय-४५ वर्षे) येथील आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details