पुणे - शहरातील जम्बो कोविड रुग्णालयातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा दोन सहकारी डॉक्टरांनीच विनयभंग केला. पीडित महिला आणि आरोपी डॉक्टर एका खासगी कंपनीच्या वतीने या जम्बो रुग्णालयात काम करतात. आरोपींनी दोन दिवसांपूर्वी पीडित महिला डॉक्टर कर्तव्यावर असताना अश्लील वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला होता.
लज्जास्पद.. पुण्यातील कोरोना केंद्रात महिला डॉक्टरचा विनयभंग; सहकारी डॉक्टरांविरोधात गुन्हा - पुण्यात महिला डॉक्टरचा विनयभंग
कोरोना केंद्रात महिला डॉक्टरचा दोघा सहकारी डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला. 25 वर्षीय महिला डॉक्टरने याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस पुण्यात वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शिवाजीनगर परिसरातील सीओईपी मैदानावर तात्पुरते जम्बो कोविड रुग्णालयात उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांची देखभाल केली जाते. यासाठी त्या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. परंतु, या रुग्णालयातून आता हा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. येथे काम करणार्या महिला डॉक्टरचा दोघा सहकारी डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला. 25 वर्षीय महिला डॉक्टरने याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही राज्यात कोविड केंद्रांमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही पुण्यातील एका महिलेचा सिंहगड रस्ता परिसरातील एका कोविड केंद्रामध्ये विनयभंग झाला होता. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा -फेसबुकवर लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल