महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाव सोडून जा..! कोरोनाग्रस्त रुग्णाच्या भावाला ग्रामस्थांची तंबी - corona virus in solapur

कोरोनाबाधीताच्या मूळ गावी राहणाऱ्या भावाला वाळीत टाकण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांकडून रुग्णाच्या भावाला गाव सोडून जा असे सांगितले जात आहे.

Corona
कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बहिष्काराची भीती; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

By

Published : Mar 11, 2020, 7:39 PM IST

पुणे -शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याला दुबई येथून परत आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर तीन लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर समाज माध्यमावर विविध माध्यमातून मेसेज फिरले, यामध्ये संबंधित रुग्णांची नावे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांचा देखील उल्लेख करण्यात आला होता. वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनाने संबंधित रुग्णांच्या नावांचा ते राहत असलेल्या ठिकाणांचा काम करत असलेल्या ठिकाणांचा उल्लेख करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, असे असताना देखील या रुग्णांची नावे त्यांचे ठिकाण उघड झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरून सामाजिक बहिष्काराचा पेच निर्माण झाल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा -कोरोना: १ ली ते ९ पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव, थोड्याच वेळात मंत्रीमंडळाची बैठक

गाव सोडून जा-

पाच रुग्णांमध्ये सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या आणि मूळच्या सोलापूर जिल्ह्यातला असलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. समाज माध्यमावर या रुग्णाचे नाव आणि राहण्याचे ठिकाण समोर आले. त्यानंतर त्याच्या मूळ गावी राहणाऱ्या रुग्णाच्या भावाला वाळीत टाकण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांकडून रुग्णाच्या भावाला गाव सोडून जा असे सांगितले जात आहे. संबंधित रुग्णाच्या भावाने या संदर्भात पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे तशी तक्रार देखील केली आहे. एकंदरीतच कोरोना विषाणूच्या भितीमुळे नागरिक बिथरले असल्याचे या माध्यमातून समोर येत आहे.

ज्या दाम्पत्याला आणि त्यांच्या मुलीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, त्या परिसरातल्या काही खासगी शाळा देखील बुधवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. अद्याप जिल्हा प्रशासनाने शाळा कॉलेजेस बंदी संदर्भात कुठलेही आदेश जारी केलेले नाही. तरीदेखील हा निर्णय घेण्यात आला अशाच प्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संदर्भात देखील चुकीचे मेसेज समाज माध्यमावर पसरवले जात आहेत. त्यामुळे एकंदरीतच नागरिकांनी अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, ज्यामुळे रुग्णांची माहिती समाजापर्यंत पोहोचून त्यांना सामाजिक बहिष्कृत केले जाण्याची भीती असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात असून, गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?'

ABOUT THE AUTHOR

...view details