महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक.. पोटच्या दोन मुलींना सोबत घेऊन पित्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या - पुणे आत्महत्या बातमी

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ आणि दहा वर्षे वय असलेल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका पित्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

father-suicide-with-two-daughters
father-suicide-with-two-daughters

By

Published : Mar 28, 2021, 8:04 PM IST

पुणे - जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ आणि दहा वर्षे वय असलेल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका पित्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. राजेंद्र शिवाजी भुजबळ (वय 42) दीक्षा राजेंद्र भुजबळ आणि ऋतुजा राजेंद्र भुजबळ असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राजेंद्र भुजबळ हे तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी. नोकरीच्या निमित्ताने ते पत्नी आणि मुलांसह पुण्याचा वानवडी परिसरात राहतात. बुधवारी राजेंद्र भुजबळ हे दोन्ही मुलींसह तळेगाव ढमढेरे येथील घरी आले होते. सायंकाळनंतर अचानक ते बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेत असताना तळेगाव ढमढेरे येथील एका विहिरीच्या कडेला राजेंद्र भुजबळ यांच्या व त्यांच्या दोन मुलींच्या चपला, मोबाईल व पैसे पडल्याचे आढळले. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details