पिंपरी-चिंचवड - बाप नात्याला काळिमा फासणारी घटना हिंजवडीत घडली आहे. बापाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ( Father Sexually Abuses Minor Girl ) धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय नराधम बापाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली.
Father Sexually Abuses Minor Girl : 'बाप' नात्याला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - पुण्यात स्वताच्या मुलीवर बलात्कार
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये बाप या नात्याला काळिमा फासणारी घटना हिंजवडीत ( Father Sexually Abuses Minor Girl ) घडली आहे. बापाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 35 वर्षीय नराधम बापाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
![Father Sexually Abuses Minor Girl : 'बाप' नात्याला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार Father Sexually Abuses Minor Girl](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14832042-1010-14832042-1648194903855.jpg)
नराधम बापाला बेड्या ठोकल्या - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याची पत्नी हे वेगवेगळे राहतात, आरोपी सोबत मुलगा आणि पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. दरम्यान, 13 आणि 14 मार्चला मुलगी घरात एकटी असताना नराधम बापाने तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर, मुलगा आणि पीडित मुलगी होळीला आजीकडे गेली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित नातीने आजीला या धक्कादायक घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर आजीने थेट पोलीस स्टेशन गाठुन नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, हिंजवडी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा -3 School Children Drowned : ओढ्यात बुडून 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू