महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मदात्यानेच पाच महिन्याच्या चिमुकलीचा नाक आणि तोंड दाबून केली हत्या - पाच महिन्यांच्या चिमुकलीचा बापाने केला खून

आरोपी बापूराव हा वाहनचालक असून तो लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून घरीच आहे. त्याचे पत्नीसोबत वाद वाढले होते. दररोज होणाऱ्या वादाच्या रागातून त्याने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा खून केला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

baby murder
baby murder

By

Published : May 9, 2020, 2:48 PM IST

पुणे - बावधन परिसरात घरगुती वादातून बापानेच पाच महिन्याच्या चिमुकलीचे नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधम बापाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे तीनच्या सुमारास घटना घडली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बापूराव नामदेव जाधव (वय ३५) असे आरोपीचे नाव असून संगीता असे चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आरोपी बापूराव हा वाहनचालक असून तो लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून घरीच आहे. त्याचे पत्नीसोबत वाद वाढले होते. दररोज होणाऱ्या वादाचा राग त्याने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकलीवर काढला. त्याने पहाटेच्या सुमाराला पत्नी गाढ झोपेत असताना चिमुकलीचे नाक आणि तोंड दाबून खून केला. घराच्या समोरील पटांगणात तिचा मृतदेह ठेवला आणि पुन्हा घरात येऊन पत्नीला झोपेतून उठवून मुलगी कुठे आहे, असा प्रश्न केला. आई आणि नराधम बाप हा चिमुकलीचा शोध घेत होते. बाप केवळ शोधण्याचे नाटक करत होता. काही अंतरावर कुत्रे भुंकत होते. चिमुकलीची आई धावत तिथे गेली. पाहिले तर काय चिमुकली निपचित पडलेली होती. तिच्या आईने हंबरडा फोडला.

आरोपी नराधम बापाने हिंजवडी पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, पोलिसांना त्याच्यावरच संशय आल्याने पोलिसांनी त्याची उलटतपासणी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. आरोपीला ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस कर्मचारी पगारे अधिक तपास करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details