महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वडिलाने कोयत्याने वार करीत केली सावत्र मुलाची हत्या; बारामती तालुक्यातील घटना - father killed his step son with a scythe

या घटनेत कोयत्याचा घाव जोरात बसल्याने मुलाचा यात जागीच मृत्यू झाला. गोपीनाथ मारुती जाधव (वय-18) असे मृत मुलाचे नाव आहे. लाकडे तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने त्याने आपल्या मुलावर वार केले.

father killed his step-son with a scythe baramati
वडिलाने कोयत्याने वार करीत केली सावत्र मुलाची हत्या

By

Published : Oct 23, 2021, 11:20 PM IST

बारामती (पुणे) - आई-वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची वडिलाने कोयत्याने मानेवर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घडली. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील शिपकुले वस्तीवर घडली. आरोपी वडील हा कातकरीचे काम करतो. लाकडे तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने त्याने आपल्या मुलावर वार केले.

मृत गोपीनाथ जाधव

अवघ्या एक तासाच्या आरोपीला अटक -

या घटनेत कोयत्याचा घाव जोरात बसल्याने मुलाचा यात जागीच मृत्यू झाला. गोपीनाथ मारुती जाधव (वय-18) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी वडील मारुती जाधव (वय-45) यास बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत अटक केली. आरोपी वडिलावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा -बेळगाव- चार मुलांना विष पाजून माजी सैनिकाची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details