महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलगी आपली नसल्याच्या संशयावरून बापानेच केला एका वर्षाच्या मुलीचा खून

आई-वडीलांइतके प्रेम कुणीच करू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, काही अशा घटना घडतात की, या वाक्यावरचा विश्वास उडून जातो. इंदापूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे.

Police Station
पोलीस स्टेशन

By

Published : Dec 18, 2020, 10:33 AM IST

पुणे - जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. मुलगी आपली नसल्याच्या संशयावरून बापानेच एक वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केला आहे. 23 नोव्हेंबरला इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करेवाडी गावात हा प्रकार घडला. पिला सकट्या काळे (वय 1 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई सोनम सकट्या काळे (वय 18) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सकट्या उर्फ चिंटू उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे याच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

काळे दाम्पत्य अहमदनगर जिल्ह्यातील आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी ते इंदापूर तालुक्यातील करेवाडी गावात आले होते. घटनेच्या दिवशी आरोपीने फिर्यादीला 'तू उस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आणि नाहीस' असे म्हणून तिच्यासोबत भांडण काढले. तसेच कोयता घेऊन तिच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी त्यांची एक वर्षाची मुलगी पिला ही कोपीमध्ये झोपलेली होती.'ही मुलगी माझी नाही आणि तिचा हुंडा देखील मी तुम्हाला मिळू देणार नाही व मीही खाणार नाही' असे म्हणत आरोपीने दोन्ही हाताने मुलीचे नाक तोंड दाबले. जीव गुदमरल्याने मुलीचा मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपी आणि सर्व कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यासाठी मूळ गावी गेले होते. गुरुवारी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details