पिंपरी-चिंचवड - युरोप खंडातील सर्वांत उंच मानले जाणारे माउंट एल्ब्रुस शिखर बाप-लेकीच्या जोडीने सर केले आहे. त्यामुळे त्यांचे पिंपरी-चिंचवड परिसरात कौतुक होत आहे. माउंट एलब्रुज शिखर सर करणारी ही पहिलीच बाप लेकीची जोडी असल्याच सांगितलं जातं आहे. गिरीजा आणि धनाजी लांडगे अशी दोघांची नावे आहेत. दोघांनी 5 हजार 642 मीटर उंच माउंट एलब्रुज या शिखरावर चढाई केली आहे. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते.
पिंपरी-चिंचवडमधील बाप-लेकीच्या जोडीने सर केले माउंट एलब्रुज शिखर - pimpari chinchwad news
गिरीजा आणि धनाजी लांडगे या बाप लेकीच्या जोडीने दोघांनी 5 हजार 642 मीटर उंच माउंट एलब्रुज या शिखरावर चढाई केली आहे. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते.
चढाई करणे खडतर गोष्ट
गिरीजाचे वडील धनंजय लांडगे म्हणाले की, शिखरावर चढाई करणारी गिरीजा महाराष्ट्रातील व भारतातली पहिलीच मुलगी आहे. एकूण 10 दिवसांच्या मोहिमेत गिरीजा आणि मी शरीर इथल्या वातावरणाशी आणि उंचीशी मिळतं जुळतं करण्यासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत 3,100 मीटर, 3,800 मीटर आणि मग 4,800 मीटर उंचीवर सराव करुन मग 26 तारखेला पहाटे 3 वाजता शिखर चढाईला सुरुवात केली आणि सकाळी सात वाजता शिखर समिट सक्सेस केले. आम्ही 15 तासांत माउंट एल्ब्रुस पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजुने असणाऱ्या मार्गांनी समिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण खूपच खराब असल्याने दोन्ही बाजूने समिट सक्सेस झाला नाही. 5,642 मीटर पश्चिम बाजूने समिट सक्सेस झाले अन हे शिखर सर या वयात सर करणारी गिरिजा पहिली मुलगी असून पहिली बाप- लेकीचे जोडी आम्ही ठरलो आहे. या मोहिमेतून गिरिजाने ‘लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा ' हा संदेश दिला .... तिची ही मोहीम तिने सर्व मुलीन्ना आणि आत्ताच निधन पावलेल्या तिच्या आजोबांना समर्पित केली आहे.
हेही वाचा -ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर; शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील सोलापूरकडे रवाना